गळ्यात नोटांचा हार घालून नवरदेव मतदानाला!

    दिनांक :19-May-2019
 मनाली: लोकसभा निवडणुकीच्या अंतिम टप्प्यातील मतदान आज रविवारी पार पडले. लोकशाहीच्या या उत्सवात मतदाना करताना कर्तव्य निभावत असताना, काही मतदारांची चर्चा समाजमाध्यमांवर झाली. मनाली लोकसभा मतदारसंघासाठी मतदानकेंद्रावर बोहल्यावर चढण्याआधी नवरदेव मतदानासाठी पोहचला. तेव्हा नवरदेवाला बघून उपस्थित मतदार आणि मतदान केंद्रावरील अधिकारी आश्चर्यचकित झाले. याचे कारण म्हणजे, गळ्यात चक्क नोटांचा हार घालून नवरदेव मतदानाला पोहचला होता! या प्रसंगाची चित्रफीत आज रविवारी समाजमाध्यमांवर चांगलीच पसरली.
दुसर्‍या घटनेत, बंगालमधील डमडम लोकसभा मतदारसंघात एका मुलाने आपल्या 80 वर्षीय वृद्ध मातेला उचलून मतदान केंद्रावर आणले. तामिळनाडूमध्ये एक 103 वर्षीय वृद्ध महिला हातात काठी घेऊन मतदानकेंद्रावर कुणाचीही मदत न घेता आली आणि तिने मतदान केले.