विदर्भ मराठवाड्यात उष्णतेची लाट कायम

    दिनांक :19-May-2019
 
 
पुणे - विदर्भ, मराठवाड्यासह मध्य महाराष्ट्राही पुन्हा तापणार असून, येत्या दोन दिवसा विदर्भात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी उष्णतेची लाट येण्याची शक्‍यता भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, शनिवारी चंद्रपूर येथे सर्वाधिक ४५.८ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली. गेल्या २४ तासांत विदर्भातील काही भागात उष्णतेची लाट होती. तर मध्य महाराष्ट्राच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत उल्लेखनीय वाढ झाली आहे. त्यामुळे पुणे शहरासह जळगाव, सोलापूर, मालेगाव, सातारा आणि कोल्हापूर येथील कमाल ४१ अंशाच्या पुढे गेले आहे. तर विदर्भातील बहुतांश शहरातील कमाल तापमान ४३ ते ४४ अंशाच्या पुढे आहे. राज्यातील कमाल तापमानाबरोबर किमान तापमानातही दोन ते तीन अंशांनी वाढ झाल्यामुळे चटका चांगलाच जाणवत आहे. दरम्यान, आज कोकण-गोव्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्‍यता हवामान विभागाने वर्तविली आहे.