ICC कडून वर्ल्डकपचे थीम साँग रिलीज; तुम्ही बघितलं का?

    दिनांक :19-May-2019
तभा ऑनलाईन टीम  
लंडन,
इंग्लंडमध्ये होणाऱ्या आगामी विश्वचषक स्पर्धेसाठी आयसीसीकडून 'स्टॅन्ड बाय' हे अधिकृत गाणे रिलीज करण्यात आले आहे. ब्रिटनची गायिका लोरिन आणि रुडिमेंटल या बॅन्डने या गाण्याची निर्मिती केली असून या गाण्यातून इंग्लंडच्या सांस्कृतिक विविधतेचे दर्शन घडते. इंग्लंड आणि वेल्समध्ये 30 मेपासून विश्वचषकाला सुरुवात होणार आहे. यावेळी मैदानावर आणि विश्वचषकाशी निगडीत कार्यक्रमांमध्ये हे गाणे वाजवण्यात येणार आहे. 
 
 
आयसीसी क्रिकेट विश्वचषकाचे काऊण्टडाऊन सुरु झाल्यामुळे चाहत्यांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे. ३० मे पासून सामन्यांना सुरुवात होणार असून ५ जून रोजी भारताचा पहिला सामना होणार आहे. पहिल्या सामन्यात भारताला दक्षिण आफ्रिकेचे आव्हान असणार आहे. तर १६ जूनला भारत-पाकिस्तानचा हाय वोल्टेज सामना रंगणार आहे. 
 
 
 
 
भारताचे सामने :
बुधवार 5 जून - भारत विरुद्ध द. आफ्रिका
रविवार 9 जून - भारत  विरुद्ध ऑस्ट्रेलिया
गुरुवार 13 जून - भारत  विरुद्ध न्यूझीलंड
रविवार 16 जून - भारत  विरुद्ध पाकिस्तान
शनिवार 22 जून - भारत  विरुद्ध अफगाणिस्तान
गुरुवार 27 जून - भारत  विरुद्ध वेस्ट इंडिज
रविवार 30 जून - भारत  विरुद्ध इंग्लंड
मंगळवार 2 जुलै - भारत  विरुद्ध बांगलादेश
शनिवार 6 जुलै - भारत  विरुद्ध श्रीलंका