नक्षलवाद्यांचा इशारा ; रस्ते पूल बांधणे बंद करा
   दिनांक :02-May-2019
 
गडचिरोली: काल महाराष्ट्र दिनी दुपारी सी-६० कमांडोजची एक जीप भुसूरुंग स्फोट करून नक्षलवाद्यांनी उडवून दिली होती. या स्फोटात एकूण १६ जवान शहीद झाले. यानंतर लगेचच दुसऱ्या दिवशी गडचिरोलीत ठिकठिकाणी धमकीचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. गडचिरोलीत रस्ते व पूल बांधणं बंद करा, अशी धमकी या पोस्टर्समधून देण्यात आली आहे.
 

 
 
भांडवलदारांची चमचेगिरी करणाऱ्यांचे मनसूबे पूर्ण होऊ देणार नाही, असा मजकूर या पोस्टर्सवर लिहिण्यात आला आहे. तसंच, काही दिवसांपूर्वी सुरक्षा दलाने गडचिरोलीत ४० नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले होते. त्यानंतर २६ एप्रिल २०१९ ला रामको नारकोटी हिचा सुरक्षा दलाने खात्मा केला होता. या दोन्ही घटनांचा निषेध नक्षलवाद्यांनी केला आहे. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीकाही करण्यात आली आहे.