स्टिव्ह स्मिथ मायदेशी परतला

    दिनांक :02-May-2019
बंगळुरू, 
डेव्हिड वॉर्नरपाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा आणखी एका दिग्गज क्रिकेटपटू स्टिव्ह स्मिथ यानेही आयपीएल 2019 स्पर्धेला प्ले ऑफचे सामने सुरू होण्याआधीच गुडबाय केले आहे. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू विरुद्ध राजस्थान रॉयल्स हा एम चिन्नास्वामी स्टेडियमवर झालेला 49 वा सामना स्मिथचा यंदाच्या स्पर्धेतील शेवटचा सामना ठरला. हा सामना पावसाच्या व्यत्ययामुळे कोणत्याही निर्णयाविना रद्द करावा लागला. 

 
 
पावसाच्या व्यत्ययामुळे हा टी-20 सामना 5-5 षटकांचा करण्यात आला होता. प्रथम फलंदाजी करीत बंगळुरूने विजयासाठी ठेवलेल्या 63 धावांच्या लक्ष्याचा राजस्थान संघ पाठलाग करीत असताना पुन्हा पावसाने हजेरी लावली. त्यामुळे राजस्थानची धावसं‘या 3.2 षटकात 1 बाद 41 धावा अशी असताना अखेर पंचांनी हा सामना रद्द केला आणि दोन्ही संघाना प्रत्येकी एक गुण बहाल केला.
 
या सामन्यानंतर स्मिथने राजस्थान संघाचा निरोप घेताना सोशल मीडियावर भावनिक पोस्ट शेअर केली. त्याने या पोस्टमध्ये म्हटले आहे की, ‘राजस्थान रॉयल्स मागील सात आठवड्यांसाठी आभार. मी या आयपीएलमधील प्रत्येक मिनिटाची मजा घेतली. तसेच मला आनंद आहे की, मी अशा संघाचा एक भाग आहे. पुढील दिल्लीविरुद्धच्या सामन्यासाठी शुभेच्छा.’
स्मिथने यावर्षी आयपीएलमध्ये एक वर्षानंतर पुनरागमन केले होते. त्याच्यावर मागील वर्षी चेंडू छेडछाड प्रकरणामुळे बंदी घालण्यात आली होती. त्याने यावर्षी आयपीएलमध्ये तीन अर्धशतकांसह 39.87 च्या सरासरीने 275 धावा केल्या.
 
तसेच त्याने राजस्थानच्या पहिल्या सात सामन्यानंतर संघाची कर्णधारपदाची जाबबदारीही सांभाळली. त्याच्या नेतृत्वाखाली पुढील पाच सामने खेळताना राजस्थानने तीन जिंकले तर एका सामन्यात पराभव स्वीकारला होता.
2019 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाचे 2 मे पासून प्रशिक्षण शिबिर सुरू होत आहे, त्यात सहभागी होण्यासाठी वॉर्नर आणि स्मिथ मायदेशी परतले आहेत.
स्मिथ हा या विश्वचषकातून मागील एक वर्षाच्या बंदीनंतर डेव्हिड वॉर्नरसह आंतरराष्ट्रीय कि‘केटमध्ये पुनरागमन करणार आहेत. स्मिथ आणि वॉर्नरवर मागील वर्षी मार्चमध्ये कि‘केट ऑस्ट्रेलियाने चेंडू छेडछाड प्रकरणामुळे एक वर्षाची आंतरराष्ट्रीय कि‘केट खेळण्यासाठी बंदी घातली होती. आता ही बंदी उठवली गेली आहे.