जेफ बेजॉस यांच्या जीवाला धोका, दिले बुलेटप्रुफ कवच
   दिनांक :02-May-2019
सॅन फ्रान्सिस्को,
जगातील सर्वात श्रीमंत असलेल्या अॅमेझॉन प्रमुख जेफ बेजॉस यांच्या जीवाला धोका असून त्यांच्या सुरक्षेत मोठी वाढ करण्यात आली आहे. बेजॉस याच्या कार्यालयात सुरक्षेसाठी बुलेटप्रूफ काच लावण्यात आली असून या काचेत बंदुकींच्या गोळ्या रोखण्याची क्षमता आहे. या बाबत प्रसारित झालेल्या वृत्तानुसार, या काचेसाठी १८०,००० डॉलर्स (सुमारे १ कोटी २५ लाख रुपये) इतका खर्च आला आहे. बेजॉस यांच्या सुरक्षेवर वर्षाला सुमारे १६ लाख डॉलर्स ( ११ कोटी १२ लाख रुपये) इतका खर्च केला जातो.
 
 
टिम कुक
इतर मोठ्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या (सीईओ) सुरक्षेचा विचार करता अॅपलचे सीईओ टिम कुक यांच्या खासगी सुरक्षेवर गेल्या वर्षी ३१०, ००० डॉलर्स ( २ कोटी १५ लाख रुपये) इतका खर्च झाला. तर, ऑरेकलच्या सीईओ लॅरी एलिसन यांच्या सुरक्षेव १६ लाख डॉलर्स इतका खर्च झाला आहे.
मार्क झुकेरबर्ग
फेसबुकचे सीईओ मार्क झुकेरबर्ग यांच्या सुरक्षेवर सन २०१६ पासून आतापर्यंत चौपट खर्च झाला आहे. गेल्या वर्षी कंपनीने त्यांच्या सुरक्षेसाठी २ कोटी डॉलर्स ( १.३९ अब्ज रुपये) इतका खर्च केला आहे.
'सौदीने हॅक केला होता बेजॉस यांचा फोन'
सोदी अरबने बेजॉस यांचा स्मार्टफोन हॅक केला होता आणि त्याचे खासगी फोटो एका मीडिया कंपनीला दिले होते असे अॅमेझॉनचे सुरक्षा सल्लागार गेविन डी. बेकर यानी गेल्याच महिन्यात डेली बीस्ट या वर्तमानपत्रात लिहिलेल्या लेखात म्हटले आहे. सौदीचे पत्रकार जमाल खगोसी यांच्या हत्येशी संबंधित बातम्या बेजॉस यांच्या वॉशिंग्टन पोस्ट या वर्तमानपत्रात प्रसिद्ध केल्यामुळे त्यांना नुकसान करण्याचे प्रयत्न झाल्याचेही बेकर यांनी म्हटले आहे.