मुख्यमंत्र्यांनी वाहिली नक्षली हल्ल्यातील शहिदांना श्रद्धांजली
   दिनांक :02-May-2019
गडचिरोली: नक्षलवाद्यांनी घडवून आणलेल्या भुसुरुंगातील स्फोटात काल शीघ्र कृती दलाचे १५ पोलीस ठार झाले होते. या शहीद पोलिसांच्या शौर्याला सलाम करीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी श्रद्धांजली वाहिली. यावेळी त्यांच्यासोबत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर हे देखील उपस्थित होते. 

 


 
 
 
शहीद पोलिसांचे पार्थिव गडचिरोलीतील पोलीस मुख्यालयात अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात आले होते. यावेळी तिथे उपस्थित असलेल्या शहीदांच्या नातेवाईकांनी मोठा आक्रोश केला. यावेळी मोठ्या संख्येने नागरिकांनी गर्दी केली होती.

दरम्यान, राज्याचे पोलीस महासंचालक सुबोध जैयस्वाल यांनी गुरुवारी सकाळी घटनास्थळी भेट दिली आणि परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर शहीद जवानांचे पार्थिव पोलीस मुख्यालयात आणण्यात आले. येथे त्यांना शासकीय इतमामात मानवंदना देत श्रद्धांजली वाहण्यात आली. 

 

 
 
 
नक्षल्यांच्या भ्याड हल्ल्यात शहिद झालेले लाखांदूर येथील जवान दयानंद शहारे यांचे पार्थिव आज त्यांच्या घरी आणण्यात आले. यावेळी आपल्या वीर जवानाच्या अंत्यदर्शनाची वाट पहात असलेल्या गावक-यांनी ‘शहिद जवान अमर रहे’ च्या घोषणा देत नक्षलवाद्यांचा निषेध केला.
 

 
 
तर दुसरीकडे,  रात्री ७:५० वाजता शहीद भूपेश चे पर्थिव लाखनी येथे घरी पोहचले ,पर्थिव येताच वन्देमातरम, भारत माता की जय, शहीद भूपेश वालोदे अमर रहे, घोषणा देण्यात आल्या यावेळी हजारोंच्या संख्येने लोक उपस्थित होते.