‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’चा ट्रेलर प्रदर्शित
   दिनांक :02-May-2019
अभिनेता अर्जुन कपूरचा आगामी चित्रपट ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. या ट्रेलरमध्ये अर्जुन कपूरची एक वेगळीच भूमिका पाहायला मिळाली आहे. ट्रेलर प्रदर्शित होताचा सोशल मीडियावर त्याला चाहत्यांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला आहे.
 
 
यामध्ये अर्जुन त्याच्या पाच मित्रांसह भारतातील मोस्ट वॉन्टेडला पकडण्याची जोखीम हाती घेतो. तसेच अर्जुनची टीम कोणाचा ही पाठिंबा नसताना व कोणत्याही हत्याराचा वापर न करता मोस्ट वॉन्टेडला पकडण्याचा सापळा रचतात.
 
‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ चा ट्रेलर २ मिनीटे ३० सेकंदाचा आहे. तसेच या चित्रपटात अर्जुनची एक वेगळीच झलक पाहायला मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा चित्रपट भारतातील अशा जवानांवर आधारित आहे ज्यांचा आतापर्यंत कधीच कुठे उल्लेख केला गेला नाही. या चित्रपटाचे दिग्दर्शन राजकुमार गुप्ता यांनी केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण भारत आणि नेपाळमध्ये झाले आहे. हा चित्रपट २४ मे २०१९ रोजी प्रदर्शित होणार आहे.
 
याआधी ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’चा टिझर प्रदर्शित करण्यात आला होता. हा टीझर पाहून अर्जुनची कथित गर्लफ्रेंड अभिनेत्री मलायका अरोडाने पोस्टवर कमेंट करण्यापासून स्वत:ला रोखू शकली नव्हती. तसेच त्याच्या चाहत्यांसह बॉलिवूड कलाकारांनी देखील अर्जुन कपूरची प्रशंसा केली आहे.