वार्‍याची दिशा पवारांनी ओळखली : गिरीश महाजन
   दिनांक :02-May-2019
 
नाशिक: राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना पराभवाची चाहूल लागली आहे. पवार राजकारणातील वार्‍याची दिशा लवकर ओळखतात, अशी त्यांची खासियत असल्याचे म्हटले जाते. त्यामुळेच ते इव्हीएकडे बोट दाखवत असल्याची टीका राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी केली आहे.
 
 
 
बारामतीमधून शरद पवारांची कन्या आणि राष्ट्रवादीच्या विद्यमान खासदार सुप्रिया सुळे पुन्हा एकदा रिंगणात आहेत. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान भाजपाच्या नेत्यांकडून बारामतीची जागा जिंकणार असल्याचा दावा केला जात आहे. त्याबद्दल बोलताना पवारांनी, जर बारामती भाजपाने जिंकली, तर लोकांचा निवडणुकांवरचा विश्वास उडेल, असे खळबळजनक वक्तव्य केले आहे. यावर महसूल मंत्री गिरीश महाजन यांनी सडकून टीका केली.
पवार प्रभावाच्या मानसिकतेतून असे बोलत असून, पराभवाआधी कारण तयार ठेवत असल्याचा पलटवार महाजन यांनी केला आहे. ते बारामतीत जिंकलो तर लोकशाही जिवंत, अन्‌ आम्ही जिंकलो, तर लोकशाही धोक्यात, याला काही अर्थ नसल्याचेही महाजन म्हणाले. इव्हीएममध्ये छेडछाड करता आली असती, तर आम्ही चार राज्यात हरलो नसतो. पराभवानंतर कॉंग्रेसने मशीनमध्ये छेडछाड केली असे आम्ही म्हटले नाही, असेही महाजन म्हणाले.