महाराष्ट्र दिनाचे औचित्यवर २८७१ लोकांचे महा श्रमदान

    दिनांक :02-May-2019
* ग्रामस्थाचा उत्साह : सकाळ , संध्याकाळ दोन वेळा केले श्रमदान
* जलसंधारणाच्या कामासाठी गावे आली एकत्र 
 
 
 
 
 
मंगरूळपीर : पानी फाउंडेशनच्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतर्गत श्रमदानाच्या माध्यमातून दुष्काळाला पराभूत करण्यासाठी तालुक्यातील ग्रामस्थ झपाटले आहेत , या तालुक्यातील ११ गावात महाराष्ट्र दिनी महाश्रमदानाच्या आधारे २८७१ लोकांनी श्रमदान करुण ४२१४ घनमीटरची कामे केली आहेत, राज्यात गेल्या तिन वर्षा पासून सुरू असलेल्या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेतर्गत १ मे हा महाश्रमदान दिन म्हणून साजरा करण्यात येतो महाश्रमदान दिनानिमित्त मंगरुळपीर तालुक्यात पिंप्रि खु गावा सह जांब , बोरव्हा बू , नागी , जोगलदरी , चकवा , लखमापुर , गणेशपुर , जनुना बू , चिंचाळा , पिंप्रि अवगण , माळशेलू , या गावाने गवकऱ्यांचा उत्साह वाढविण्यासाठी वाशिम जिल्हाधिकारी ऋषिकेश मोडक , मुख्यकार्यकारी दिपककुमार मीणा , जिल्हा अधीक्षक गवसाने ,पानी फाउंडेशन चे जिल्हा समन्वयक सुभाष नानवटे उपविभागीय अधिकारी गोकटे , तहसीलदार किशोर बागडे , गटविकास अधिकारी टाकरस , उमेद चे श्रद्धा चक्रे , लघु सिंचन विभाग , तालुका कृषी अधिकारी सचिन कांबळे , प्राथमिक आरोग्य केंद्र , व्यापारी संघटना चारभुजा नित्य योग मंडळ , राजस्थानी महिला मंडळ , सामाजिक संघटना , पत्रकार मंडळी , वाशिम येथील नॅझरिन नर्सिंग ट्रनिंग कॉलेज , मी वाशिम ग्रुप , महाश्रमदानात सक्रीय सहभाग घेतला असून भुसावळ , नागपुर , वर्धा , अमरावती , पुणे येथून जलमित्र सुद्धा श्रमदान करण्यासाठी आले , वॉटर कप साठी मंगरुळपीर तालुक्याचे हे दूसरे वर्ष असून या वर्षी ५९ गावाने स्पर्धेत सहभाग घेतला , या गावामधुन २० गावात जलसंधारण ची कामे श्रमदान मधून तर कुठे मशीन च्या काम सुरू आहे, ७ एप्रिल च्या मध्यरात्री १२ वाजल्यापासून म्हणजे ८ एप्रिल च्या सुरुवातला पिंप्रि खु गावाने सुरुवात करुण १ मे ला महाश्रमदान सकाळ , संध्याकाळ दोन्ही सत्रांत १३०४ नागरिकांनी ४८० घनमीटर काम केले तर जांब गावात तालुक्याचे तहशीलदार किशोर बागडे सह माविम च्या महिलांनी मोठ्या प्रमानात श्रमदान करण्यासाठी सहभाग घेतला , तालुक्यातील ११ गावातही मंडळ अधिकारी , ग्रामसेवक , तलाठी , यांनी सुद्धा सहभाग घेतल्याने गांवकऱ्यांन मधे वॉटर कप च्या कामा साठी उत्साह वाढला हे काम लोक आपले कामसमजून सदर कामाला जलचळवळी चे तालुक्यात स्वरुप आले असल्याने पानी फाउंडेशन चे तालुका समन्वयक समाधान वानखडे , अतुल तायडे , चेतन आसोले , कल्याणी वडस्कर , मयुरी काकड़ , दिपमाला तायडे , निलेश भोयरे , अक्षय सर्याम , आश्विन बहुरूपी , जलमित्र गोपाल भिसडे , देवानंद काळबांडे , तालुक्यात परिश्रम घेत आहेत.