कॉंग्रेस-भाजपामध्ये छुपा समझोता मायावतींचा आरोप
   दिनांक :02-May-2019
 लखनौ:  कॉंग्रेस आणि भाजपा या दोन्ही राष्ट्रीय पक्षांमध्ये छुपा समझोता असून, लोकसभा निवडणुकीसाठी हे दोन्ही पक्ष संयुक्तरीत्या सपा-बसपा आणि रालोद आघाडीच्या विरोधात उत्तरप्रदेशात काम करीत असल्याचा आरोप बसपाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी आज गुरुवारी केला आहे.
भाजपाच्या उमेदवाराने निवडणूक जिंकल्यास कॉंग्रेसला ती समस्या वाटत नाही. मात्र, सपा-बसपा आणि रालोद आघाडीचा उमेदवार उत्तरप्रदेशातून निवडून येऊ नये, या प्रयत्नात दोन्ही पक्ष असल्याचा आरोप त्यांनी केला.
भाजपाप्रमाणेच कॉंग्रेस पक्षानेही सपा-बसपा आघाडीच्या विरोधात हास्यास्पद आरोप करणे सुरू केले आहे. या दोन्ही पक्षांचा सपा-बसपा आघाडीविरोधात छुपा समझोता असून, ते आमच्या आघाडीविरोधात संयुक्तपणे लढत आहेत, असा आरोप करीत, कॉंग्रेसला पािंठबा देऊन मते वाया घालवू नका, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.
 

 
 
मायावती आणि सपाचे प्रमुख अखिलेश यादव यांचे नियंत्रण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हातात असल्याचा आरोप कॉंग्रेस पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बाराबंकी येथे बुधवारी झालेल्या प्रचारसभेत केला होता. मागील पाच वर्षांत सपा िंकवा बसपाने पंतप्रधान मोदींवर कितीवेळा हल्ला केला, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला होता. मायावती िंकवा मुलायमिंसह यादव यांनी एकवेळा तरी मोदींविरोधात वक्तव्य केल्याचे तुम्ही ऐकले का, असा प्रश्न विचारताना त्यांनी मी मोदींना घाबरत नाही. मी त्यांची काळजीही करीत नाही. कुणी घाबरत असेल, तर ते मोदी आहेत. मात्र, मायावती आणि अखिलेश यादव यांचे नियंत्रण मोदींच्या हातात आहे, असे त्यांनी या प्रचारसभेत सांगितले होते.
पंतप्रधान मोदींनी आंबेडकर यांचे नाव घेऊन बसपाच्या विरोधात वक्तव्य केले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव ते मतांच्या राजकारणासाठी आणि स्वहित साधण्यासाठी घेत आहेत. मात्र, आंबेडकर हे बसपाचा आत्मा आहेत. भाजपाप्रमाणे ‘रामनाम जपना जनता को ठगना’ हे राजकारण बसपा करीत नाही, असे मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना सांगितले. कॉंग्रेसप्रमाणे बनावट आंबेडकरवादी होण्याचा प्रयत्न करू नये असा सल्ला भाजपाला देऊ इच्छिते, असेही मायावती यांनी निवेदनात म्हटले आहे. 
Tags: