फुलराणीचा २१२ व्या क्रमांकावरील खेळाडूकडून पराभव

    दिनांक :02-May-2019
नवी दिल्‍ली, 
न्यूझीलंड ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत धक्‍कादायक निकालाने सर्वांचे लक्ष वेधले. जागतिक क्रमवारीत २१२ व्या स्थानावर असलेल्या चीनच्या वँग झियी हिने धक्कादायक विजय नोंदवला. जागतिक क्रमवारीत नवव्‍या स्‍थानावर असणार्‍या भारताच्‍या ‘फुलराणी’ सायना नेहवालचे अव्‍हान संपुष्‍टात आले. यामुळे सायनाचे चाहते निराश झाले आहेत. 

 
या सामन्‍यात भारताच्या २९ वर्षीय सायनाचा १९ वर्षीय वँगविरुद्ध एक तास सात मिनिटांपर्यंत सामना रंगला होता. या सामन्‍यात सायनाचा १६-२१, २३-२१, ४-२१ अशा गेममध्ये पराभव पत्करावा झाला. पहिल्या गेममध्ये केलेल्या संथ खेळामुळे सायनाने गेम गमावला.
२१२ व्या स्थानावर असलेल्या चीनच्या वँगला तगडी झुंज देताना सायनाने दुसरा गेम जिंकून सामना बरोबरीत केला. यानंतर सायना बाजी मारेल अशी चाहत्‍यांची अपेक्षा होती. मात्र सलग ८ गुणांची कमाई करत चीनच्‍या वँगने दमदार आघाडी घेतली. यामुळे अगदी सहजपणे सायनाला हरवून तिला स्पर्धेतून वँगने बाहेरचा रस्ता दाखवला. तसेच अंतिम गेममध्ये सायनाला कँगपुढे आव्हान निर्माण करण्यातही अपयश आले.