मुळशी धरणात बुडून तिघांचा मृत्यू

    दिनांक :02-May-2019
पुणे : पुण्याजवळच्या मुळशी धरणात बुडून तिघांचा मृत्यू झाल्याची धक्कादायन घटना आज उघडकीस आली. मिळालेल्या माहितीनुसार संगीता नेगी, शुभम राज सिन्हा आणि शिवकुमार हे तिघे आपल्या मित्रांसोबत परिसरातीलच एका रिसॉर्टवर मुक्कामी आले होते. सकाळी हे तिघे पोहण्यासाठी म्हणून धरणात उतरले, दरम्यान पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने हे तिघेही बुडाले आणि तिथेच त्यांचा मृत्यू झाला.  हे सर्व भारती विद्यापीठचे विद्यार्थी आहेत. दरम्यान, घटनेची माहिती पौड पोलिसांना दिल्यानंतर एका मुलीचा मृतदेह काढण्यात पोलिसांना यश आले  आहे.