मलकापूर जवळ भीषण अपघात; १३ जण जागीच ठार

    दिनांक :20-May-2019
 
मलकापूर: मलकापूर येथून अनुराबाद-झोडगा येथे प्रवासी घेवून जाणाऱ्या महिंद्रा मॅक्झीमो गाडी भरधाव ट्रकखाली चिरडल्याने झालेल्या भीषण अपघातात मॅक्झीमो गाडीतील १३ प्रवासी जागीच ठार तर ३ जण गंभीर जखमी झाले आहेत. आज दुपारच्या सुमारास हा अपघात झाला.  मलकापूर नॅशनल हायवे ६ वर असलेल्या रचना सोया ऑइल रिफयनरी कारखान्यासमोर ट्रक आणि महिंद्रा मेकॅझिमो भीषण अपघात झाला आहे.
 
गाडीमध्ये १६ प्रवासी होते. खरंतर चारचाकी असल्यामुळे १६ प्रवाशांची जागा नव्हती. पण जबरदस्तीने प्रवासी गाडीत बसवण्यात आले होते अशी माहिती स्थानिकांकडून देण्यात आली आहे. १६ प्रवाशांपैकी १३ जणांनानी अपघातामध्ये आपले प्राण गमावले आहेत यात २ महिला ३ लहानमुल आणि ८ पुरुषांचा समावेश आहे. मृतांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याचं पोलिसांनी म्हटलं आहे. हायवे मार्गावर अपघात झाल्यामुळे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. स्थानिकांनी अपघाताची माहिती पोलिसांना दिली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले.