ब्राझीलच्या हॉटेलमध्ये ७ बंदूकधाऱ्यांचा अंधाधुन गोळीबार

    दिनांक :20-May-2019
 
 ११ जण ठार    

 
 
तभा ऑनलाईन टीम,  
ब्राझीलच्या बेलेम शहरातील उत्तरी भागात एका हॉटेल(बार) मध्ये जोरदार गोळीबार झाल्याची घटना समोर आली आहे. या हल्ल्यात ११ जण जागीच ठार झाले आहेत. ही भयानक घटना शहराच्या मध्यभागी रविवारी रात्री घडली आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. मृतांमध्ये ६ महिला आणि ५ पुरुषांचा समावेश आहे.
 
 
स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, या गोळीबारामध्ये 7 बंदूकधारी असून, त्या सर्व हल्लेखोरांनी आपल्या तोंडावर काळ्या रंगाचे माक्स चढवले होते. त्यामुळे हल्लेखोरांची ओळख पटवणे अवघड जात असून, अद्याप स्थानिक पोलीस त्यांच्या शोधात आहे. त्यामुळे हा दहशतवादी हल्ला होता कि कोणत्या स्थानिक संघटनेकडून हा गोळीबार करण्यात आला होता हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. 2017 च्या सर्वेनुसार ब्राझीलमध्ये 64 हल्ले झाले असून, त्यातील 70 हल्ले गोळीबार करून झाले आहे.