मोगॅम्बो पुन्हा खुश होणार; 'मिस्टर इंडिया २' येतोय

    दिनांक :20-May-2019
मुंबई:
'हवा-हवाई', 'कांटे नही कटते' सारखी गाणी, 'मोगॅम्बो खुश हुआ' सारखे डायलॉग्स आणि अनिल कपूर-श्रीदेवीच्या सुपरहिट जोडी यामुळे 'मिस्टर इंडिया' तुफान गाजला. या अफलातून चित्रपटाचा सिक्वेल येतोय. १९८७ ला या चित्रपटाच्या निमित्तानं एकत्र आलेली निर्माते शेखर कपूर आणि अभिनेता अनिल कपूर यांची जोडी पुन्हा एकदा एकत्र येतेय.
 
 
शेखर यांनी नुकतीच अनिल कपूर यांची भेट घेतली असून, तेव्हाचा फोटो त्यांनी शेअर केला. शेखर कपूर यांनी फोटो शेअर करताना लिहिलंय की, 'मिस्टर इंडिया २ साठी लुकची चर्चा करताना'... सध्या हा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय आणि मि. इंडिया पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर पाहता येणार या गोष्टीचा प्रेक्षकांना आनंद होतोय. एव्हरग्रीन अनिल कपूर याविषयी बोलताना सांगतो, की, 'आम्ही काहीतरी नवीन करण्याच्या विचारात आहोत. त्यासाठी सध्या आमची चर्चा सुरू आहे. 'मिस्टर इंडिया'तली ती जादू पुन्हा एकदा दाखवण्याचा आमचा प्रयत्न असेल.'