मोटरपंप चोरास अटक

    दिनांक :20-May-2019
हिंगणघाट : शेतातील विहिरीवर लावण्यात आलेला मोटरपंप चोरी केल्या प्रकरणी एका आरोपीस अटक करण्यात आली आहे.
चिंचोली येथील दिलीप रामभाऊ राऊत यांच्या शेतातून दोन मोटरपंप चोरी करण्यात आल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल
करण्यात आली होती. प्रकरणाचा तपास करीत असलेल्या गुन्हे शाखेच्या चमूने संशयाच्या आधारे प्रवीण महादेव सोगे (28) रा.घाटसावली यास ताब्यात घेण्यात आले. तपासा दरम्यान त्याने चोरी केल्याची कबुी दिली. त्याचेकडून 22 हजार रूपये किमतीचे
दोन मोटरपंप, बैलगाडी असा एकूण 29 हजार रूपये किमतीचा ऐवज जप्त करण्यात आला. ही कारवाई पोलिस अधीक्षक डॉ.
बसवराज तेली, उपविभागीय पोलिस अधिकारी भीमराव टेले, पोलिस निरीक्षक सत्यवीर बंडेवार यांच्या मार्गदर्शनात पोलिस
कर्मचारी रवींद्र वानखेडे, गजेंद्र धर्मे, समीर कामडी, सतीश नंदागवली, चालक धीरज पांडे यांनी केली.