वारसहक्कासाठी मायलेकीचे तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषण

    दिनांक :20-May-2019
कारंजा लाड: धरणात संपादित केलेल्या जमिनीचा मोबदला मिळण्यासाठी कारंजा तालुक्यातील सोमठाणा येथील मायलेकीने 20 मे पासून कारंजा तहसील कार्यालयासमोर आमरण उपोषणास प्रारंभ केला आहे. सोनाबाई काशिनाथ अने व सुलोचना काशिनाथ अने असे उपोषणकत्र्यांचे नावे असून ते कारंजा तालुक्यातील सोमठाणा येथील रहिवाशी आहेत.
 

 
 
 
निवेदनानुसार सोमठाणा येथील काशिनाथ अने यांची शेत सर्व्हे नं. 1/3 व 15 मधील 4 हेक्टर 95 आर एवढी शेती रापेरी येथील धरणासाठी शासनाने संपादित केली. उपोषणकत्र्यांच्या म्हणण्यानुसार त्यानंतर काशिनाथ अने यांचे निधन झाले. व उपोषणकर्त्यांना वारस न करता काशिनाथ यांच्या दुसर्‍या पत्नी केसरबाईच्या मुलांची वारस म्हणून नोंद करण्यात आली. त्यामुळे सदर जमिनीचा मोबदला हा त्या वारसांच्या नावे आला आहे. परंतु मोबदल्याची रक्कम वारसांना न वाटता भुसंपादन प्राधिकरण व पुनर्वसन आणि पुर्नस्थापना प्राधिकरण जुने आयुक्त कार्यालय नागपूर यांचेकडे जमा करावी शिवाय कारंजा उपविभागीय अधिकारी अनुप खांडे, उपजिल्हाध्किारी आर डी काळे, वरिष्ठ लिपीक गावंडे, व विद्या जगाडे यांची चैकशी करून त्यांना निलंबित करण्यात यावे या मागणीसाठी उपोषणार्थी उपोषणास बसले आहे. कार्यालयीन माहितीनुसार संपादित जमिनीचा मोबदला हा शाम अने यांच्या नावे 19 लाख 2 हजार 642 , गणेश अने यांच्या नावे 42 लाख 31 हजार 394, अविनाश अने यांच्या नावे 19 लाख 88 हजार 995, केशरबाई अने यांच्या नावे 17 लाख 36 हजार 612 व कनिक अने यांच्या नावे 17 लाख 58 हजार 458 असा मंजुर झाला आहे.
परंतु सदर रक्कम उपरोक्त वारसांना न देता सदर प्रकरण कारंजा व मंगरूळनाथ न्यायालयात न्यायप्रविष्ठ असल्याने न्यायालयाचा निकाल लागेपर्यंत वारसांना देण्यात येऊ नये अशी मागणी उपोषणकर्त्यांनी सादर केलेल्या निवेदनात केली आहे. दरम्यान 20 मे रोजी उपोषण मंडपास एकाही प्रशासकीय अधिकाायांनी भेट दिली नाही. मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही, असे उपोषणकर्त्यांनी सांगीतले.