इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी जोको विडोडो यांची फेरनिवड

    दिनांक :21-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
जकार्ता, 21 मे
इंडोनेशियाच्या राष्ट्राध्यक्षपदी जोको विडोडो यांची आज मंगळवारी फेरनिवड झाली आहे. त्यांनी आपले प्रतिस्पर्धी प्रबाबो सुबिअँटो यांचा पराभव केला. निवडणूक आयोगाने आज विडोडो यांच्या विजयाची घोषणा केली. 57 वर्षीय विडोडो यांना 55.5 टक्के मते मिळालीत. विडोडो यांचे प्रतिस्पर्धी 67 वर्षीय सुबिअँटो यांना 44.5 टक्के मते मिळालीत. 
 
 
 
दरम्यान, विरोधकांनी निवडणुकीत गैरप्रकार झाल्याचा आरोप केला आहे. विरोधकांचा पवित्रा बघून, राजधानी जकार्ता येथे 32 हजार सुरक्षा जवान तैनात करण्यात आले आहेत.
 
इंडोनेशिया हा जगातील सर्वात मोठा मुस्लिमबहुल देश आहे. इंडोनेशियामध्ये 17 एप्रिल रोजी राष्ट्राध्यक्ष, उपराष्ट्रपतिपदासाठी निवडणुका झाल्यात.