अर्जुन कपूर करणार नाही लग्न

    दिनांक :21-May-2019
बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चेत असणारे कपल म्हणजे अभिनेता अर्जुन कपूर आणि अभिनेत्री मलायका अरोरा. मलायका आणि अर्जुन गेल्या काही दिवसांपासून ऐकमेकांना डेट करत आहेत. आजकाल हे कपल फारसं एकत्र पाहायला मिळत नसलं तरी या दोघांनी त्यांच्या नात्याची कबूली दिली आहे. तसेच हे दोघे लवकरच लग्न बंधनाता अडकणार असल्याचे म्हटले जात आहे.
 
 
डेक्कन क्रॉनिकलसह झालेल्या एका मुलाखतीमध्ये अर्जुन कपूरला काही प्रश्न विचारण्यात आले होते. त्यामध्ये अर्जुनाला त्याच्या लग्नाचे काही विशेष प्लॅन आहेत का असा प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर अर्जुनने हसत मी लग्न करणार नाही कारण लग्नानंतर माणसांना टक्कल पडते असे उत्तर दिले. ‘मी नेहमीच बेधडकपणे बोलतो. मी तुम्हाला कधीच आश्चर्याचा धक्का देणार नाही. जर काही महत्वाचे आणि सांगण्याजोगे असेल तर मी तुम्हाला त्याबाबत माहिती देईन आणि तुम्हाला त्याचा हिस्सा होण्यास देखील सांगेन’ असे अर्जुन पुढे म्हणाला.
अर्जुन कपूरचा आगामी चित्रपट ‘इंडियाज मोस्ट वॉन्टेड’ लवकरच प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन राज कुमार गुप्ता यांनी केले आहे. चित्रपटाचे चित्रीकरण भारत आणि नेपाळमध्ये करण्यात आले आहे. सूत्रांच्यामाहितीनुसार हा चित्रपट भारतातील अशा जवानांवर आधारित आहे ज्यांचा आता पर्यंत कधीच कुठे उल्लेख केला गेला नाही. हा चित्रपट २४ मे २०१९रोजी प्रदर्शित होणार आहे.