‘एक्झिट पोल’चा निष्कर्ष खरा ठरणार- अरुण जेटली

    दिनांक :21-May-2019
 नवी दिल्ली: मतदानोत्तर निष्कर्षानुसार लोकसभा निवडणुकीचे निकाल लागणार आणि नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात पुन्हा एकदा भाजपाप्रणित रालोआ सरकार सत्तेत येणार, असा दावा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी केला.
जवळजवळ सर्वच मतदानोत्तर निष्कर्षानुसार, भाजपा सरकार बहुमताचा आकडा पार करणार आहे. वृत्तवाहिन्यांच्या या सर्वेक्षणात इव्हीएमचे काहीच योगदान नसते. पत्रकार मतदान करून बाहेर पडणार्‍यांना काही प्रश्न विचारतात व त्या आधारित निष्कर्ष जहीर करीत असतात. निवडणुकीचा निकाल वृत्तवाहिन्यांच्या निष्कर्षाप्रमाणे लागला तर विरोधकांची इव्हीएमवरील टीका निरर्थक ठरणार असल्याचे जेटली यांनी टि्‌वटरवर म्हटले आहे.
असे झाले तर मतदार किती परिपक्व आहेत, हे स्पष्ट होईल. कारण मतदार मत देण्यापूर्वी राष्ट्रीय हिताचा विचार करतात. जेव्हा चांगले विचार करणारे समान विचाराने एकाच दिशेने मतदान करतात, तेव्हाच असे होऊ शकते, असे जेटली यांनी स्पष्ट केले.
गांधी परिवार हा देशातील सर्वांत जुना असलेल्या कॉंगे्रससाठी ओझे बनला आहे, अशी टीका करताना, मतदार आता विरोधकांवर विश्वास ठेवण्यास तयार नाही. जातीवर आधारित आघाड्या मतदारांना मान्य नाहीत, तसेच लोक आता खोट्या मुद्यांवर विश्वास ठेवण्यासही तयार नाही, अशी टीकाही जेटली यांनी केली.