बस आणि कंटेनरची धडक

    दिनांक :21-May-2019
तळेगाव: तळेगाव नजीक देवगाव फाट्या जवळ काल सकाळच्या सुमारास बस आणि कंटेनरची धडक तळेगाव आगाराची mh.40.y.5278 ही बस इकबाल झावरे हे चालवत होते. सकाळी 6.30 च्या सुमारास तळेगाव मोरशी कडे जात असतांना देवगाव फाट्या नजीक पुलाजवळ आष्टी कडून येणाऱ्या कंटेनरने  (क्रमांक NL.01.N.9802) बसला जोरदार धडक दिली.   या अपघातात दोन्ही वाहनांच्या समोरच्या भागाचा चुराडा झाला.  या अपघातात दोन्ही चालकांच्या डोक्याला गंभीर गंभीर इजा झाली आहे. अपघाताची माहिती मिळताच तळेगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व जखमींना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले.