अचानक आलेल्या वादळाने कुरखेडा मार्गावरील वाहतूक खोळंबली

    दिनांक :21-May-2019
 
कुरखेडा: आज सायंकाळी सहा साडेसहाच्या सुमारास तालुक्यात अचानकपणे विजेच्या गडगडासह झालेल्या वादळी पावसात कुरखेडा वडसा मार्गावरील गेवर्धा जवळ चिचवाचे विस्तीर्ण झाड चार चाकी वाहनावर कोसळले मात्र सुदैवाने जीवित हानी झाली नसली तरी चारचाकी वाहनाचे नुकसान झालेआहे तर या वादळाने गेवर्धा येथील अनेक घराचे छप्पर उडाल्याने अतोनात नुकसान झाले आहे झाड रस्त्यावर कोसळल्याने कुरखेडा वडसा मार्गावरील वाहतूक तीन तास बंद होती , तसेच 33 केव्ही लाईनवर सुध्दा झाड पडल्याने कुरखेडा तालुक्यातील वीजपुरवठा ठप्प होता रस्त्यावर पडलेले झाड बाजूला सारण्यासाठी  गेवर्धा येथील गावकऱ्यांनी  सहकार्य केले. वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी वीज विभागातील कर्मचाऱ्यांनी तत्परता दाखविली.