संघातून वगळल्याने 'त्याने' बांधली काळी पट्टी

    दिनांक :21-May-2019
तभा ऑनलाईन टीम 
नवी दिल्ली,
आयपीएल नंतर क्रिकेट जगतात सर्वत्र चर्चा सुरु आहे ती इंग्लंडमध्ये होत असलेल्या विश्चचषकाची. मात्र विश्वचषक सुरू होण्यापूर्वीच क्रिकेट जगतात नाराजीचे नाट्य सुरू झाले आहे. इंग्लंडविरुद्धच्या मालिकेतील लाजिरवाण्या कामगिरीनंतर पाकिस्तानच्या संघाने विश्वचषक संघात बदल करण्याचा निर्णय घेतला. जलद गोलंदाज जुनैद खान याच्यासोबत तीन खेळाडूंना संघातून वगळले आहे. निवड समितीच्या या निर्णयावर जुनैदने तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.

 
पाकिस्तानने याआधी जाहीर केलेल्या संघातून जुनैद खान व फहीम अशरफ यांचे नाव वगळण्यात आले असून त्यांच्या जागी मोहम्मद आमीर व वाहब रियाज यांचा समावेश करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर नारीज प्रकट करताना गोलंदाज जुनैदने तोंडावर काळी पट्टी बांधून निषेध व्यक्त केला. त्याने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला. 'मला काही बोलायचे नाही. सत्य नेहमी कटू असतं'. अशी कॅप्शनदेखील त्याने दिली. त्याच्या या भुमिकेमुळे तो ट्रोल झाला. टीका झाल्यानंतर त्याने हा फोटो डिलीट केला.
इंग्लंडविरूद्ध खेळण्यात आलेल्य एकदिवसीय सामन्यात संघातील गोलंदाजांना अपयश आल्याने विश्वचषकात आमीर व रियाज या अनुभवी शिलेदारांना संधी देण्यात आली आहे. त्यांना न घेऊन आम्ही फार मोठी चूक केली असती,''अशी कबुली इंजमाम उल हकने दिली.
पाकिस्तानचा संघ
फखर जमान, इमाम-उल-हक, आसीफ अली, मोहम्मह हाफीज, बाबर आझम, सर्फराज अहमद ( कर्णधार), हॅरिस सोहेल, शोएब मलिक, इमाद वसीम, शादाब खान, हसन अली, शाहिद आफ्रिदी, मोहम्मद आमीर, वाहब रियाज, मोहम्मद हसनैन.