रालोआला ३२५ जागा मिळणार

    दिनांक :21-May-2019
अंकशास्त्र अभ्यासक नरेंद्र धारणे यांचे भाकीत
 
 नाशिक: नरेंद्र मोदी हेच पुन्हा एकदा पंतप्रधान होतील. भाजपाप्रणित रालोआला किमान 325 जागा मिळतील, असे भाकीत नाशिक येथील अंकशास्त्राचे गाढे अभ्यासक नरेंद्र धारणे यांनी वर्तवले आहे. एकट्या भाजपाला 284 ते 290 जागा मिळेल, असा दावाही त्यांनी केला आहे.
नरेंद्र मोदी यांची जन्मतारीख 17-09-1950 आहे. या सर्व आकड्यांची बेरीज सहा होते. त्यांचे सध्या३२५चे वय 69 वर्षे असून, याचीही बेरीज सहा होते. त्यामुळे 6 हा मोदींचा भाग्यांक, तोच त्यांना िंजकून देणार आहे, असे मत त्यांनी व्यक्त केले. अंकशास्त्र 100 टक्के सत्य असून, माझी भविष्यवाणी खरीच ठरणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
नाशिकमध्ये शिवसेनेचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हेच पुन्हा विजयी होतील, असा अंदाजही धारणे यांनी काढला आहे.