उष्मघाताने शेतशिवारातच वृध्द महिलेचा मृत्यू

    दिनांक :21-May-2019
 
गिरड: समुद्रपुर तालुक्यातील गिरड येथे वृध्द महिलेचा उष्मघाताने मुत्यु झाल्याची घटना आज मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली. गिरड येथिल वृध्द महिला सत्यकांता रामाजी लोहकरे वय ७५ आज नेहमी प्रमाने स्वताच्या शेताकडे सरपन गोळा करण्यासाठी गेली असता, उन्हाच्या तडाख्याने अस्वस्थ वाटू लागले .दरम्यान दिलीप नौकरकर यांचे शेतातील विहिरीवर पाणी पिण्यासाठी आली.अशात शेतातील गोठ्याजवळ सावली शोधत असतांना तिचा मृत्यू झाला. शेतकरी दिलीप नौकरकर हे सायंकाळी शेतात गेले असता त्यांना ही वृध्द महिला बंड्या जवळ मुत्य अवस्थेत आढळून आली. या संबंधी गिरड पोलिसांंना माहिती देताच ठाणेदार महेंद्र ठाकुर, पोलिस कर्मचाऱ्यांरी रामदास दराडे,अजय वानखेडे पोलिस पाटील इंद्रपाल आटे यांनी घटनास्थळ गाठून पंचनामा करीत म्रुतदेह शवनिच्छेदनासाठी समुद्रपुर ग्रामिण रुग्णालयात पाठविले. सदर महिलेचा मुत्यु हा उष्मघाताने झाला असावा असा अंदाज व्यक्त केल्या जात आहे. या प्रकरणी गिरड पोलिस ठाण्यात अकस्मीत मुत्युची नोंद केली असुन पुढिल तपास सुरु आहे.