मतदानोत्तर निष्कर्षांमुळे घाबरू नका : प्रियांका

    दिनांक :21-May-2019
 नवी दिल्ली: मतदानोत्तर निष्कर्षावर विश्वास ठेवू नका आणि घाबरूनही जाऊ नका. ज्या ठिकाणी इव्हीएम ठेवण्यात आले आहेत, तिथे मजबूतपणे उभे राहा आणि इव्हीएमचे रक्षण करा, असा सल्ला कॉंगे्रसच्या महासचिव प्रियांका वढेरा यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला आहे. रविवारी एक्झिट पोलचे आकडे समोर आल्यानंत प्रियांका वढेरा यांनी प्रथमच प्रतिक्रिया दिली.
कार्यकर्त्यांनी अशा अफवांवर विश्वास ठेवून घाबरण्याचे काहीच कारण नाही, असे प्रियांका यांनी एका संदेशात म्हटले आहे. अशा अफवा कार्यकर्त्यांचे मनोबल खचविण्यासाठी पसरविल्या जात आहेत, म्हणून सावधता अधिक महत्त्वपूर्ण असते. मतमोजणी केंद्रांवर खंबीरपणे उभे राहा, असे त्या म्हणाल्या.