सलमानला नकोय राष्ट्रीय पुरस्कार

    दिनांक :21-May-2019

जवळपास तीन दशकांपासून बॉलिवूडचा ‘भाईजान’ अर्थात सलमान खान इंडस्ट्रीवर राज्य करतोय. सलमानच्या कित्येक चित्रपटांनी बॉक्स ऑफीसवर कमाईचे विक्रम रचले. अनेकदा वादात अडकलेल्या ‘दबंग खान’ला प्रेक्षकांना कसे चित्रपट आवडतात हे अचूकपणे कळलेलं आहे. पण आजपर्यंत सलमानला एकदाही राष्ट्रीय पुरस्कारासाठी नामांकन मिळालेले नाही. हा पुरस्कार मिळावा अशी इच्छा आहे का असा प्रश्न विचारल्यावर सलमानने राष्ट्रीय पुरस्कार नको असल्याचं सांगितलं.

 

 
 

‘मला राष्ट्रीय किंवा इतर कोणताही पुरस्कार नकोय. मला फक्त बक्षीस हवंय. लोक जेव्हा माझा चित्रपट पाहण्यासाठी चित्रपटगृहात जातात, तोच माझ्यासाठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याचा आनंद असतो. संपूर्ण देशभरातील लोकांनी माझा चित्रपट पाहणे यापेक्षा दुसरा कोणताच पुरस्कार मोठा नाही आणि हेच बक्षीस मला हवंय,’ असं सलमान म्हणाला. या चित्रपटाच्या प्रमोशननिमित्त आयोजित कार्यक्रमात सलमानने ही भावना व्यक्त केली.