हावडा-मुंबई रेल्वेच्या कोचला आग

    दिनांक :22-May-2019
- बडनेरा स्थानकावर उडाली खळबळ

 
 
अमरावती,
बडनेरा रेल्वे स्थानकावर बुधवारी दूपारी साडेबाराच्या सुमारास हावडा-मुंबई या रेल्वे गाडीच्या एस 11 या कोचच्या खालील बाजूस ब्रेक बाइंडिगमुळे आग लागली. त्यामुळे काहीकाळासाठी खळबळ उडाली होती. लवकरच आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले.
S-11 कोचच्या खाली आग लागल्याची घटना फलाटावर कार्यरत असलेल्या रेल्वे कर्मचार्‍यांच्या लक्षात आली. त्यांनी लगेच ही माहिती आपल्या वरिष्ठ अधिकार्‍यांना दिली. त्यांनी फलाटाकडे धाव घेतली.
 
क्षणाचाही विलंब न लावता या आगीवर फोमचा मारा करून ही आग विझविण्यात आली. रेल्वेच्या अधिकारी व कर्मचार्‍यांनी संपूर्ण कोचचे निरीक्षण केले. तोपर्यंत प्रवाशांमध्ये धाकधाकू सुरू होती. या आगीमुळे हावडा-मुंबई रेल्वे एक तास बडनेरा रेल्वे स्थानकावर उभी होती, नंतर या गाडीला मुंबईकडे रवाना करण्यात आले.