पॅरिसमधील भारताचे राफेल कार्यालय फोडण्याचा प्रयत्न

    दिनांक :22-May-2019
फ्रान्सची राजधानी पॅरिसमध्ये असलेले राफेलचे कार्यालय फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. पॅरिस शहरात इंडियन एअर फोर्सच्या राफेल प्रोजेक्ट मॅनेजमेंट टीमचे कार्यालय आहे. रविवारी रात्री ही घटना घडली. फ्रान्समध्ये सुरु असलेले राफेल फायटर विमानांच्या उत्पादनाचे काम पाहण्यासाठी तसेच प्रशिक्षणासाठी इंडियन एअर फोर्सची एक टीम पॅरिसमध्ये आहे.
 

 
ग्रुप कॅप्टन रँकचा अधिकारी या टीमचा प्रमुख आहे. भारताने फ्रान्स बरोबर ३६ राफेल फायटर विमाने खरेदीचा करार केला आहे. भारत डासू कंपनीकडून ही विमाने विकत घेणार आहे. एअर फोर्सने दिल्लीत संरक्षण मंत्रालयाला या घटनेची माहिती दिली आहे.