विश्वचषकासाठी भारतीय संघ इंग्लंडला रवाना

    दिनांक :22-May-2019
३० मे पासून सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेसाठी विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ इंग्लंडला रवाना झाला आहे. ५ जून रोजी भारतीय संघाचा पहिला सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी भारतीय संघ विश्वचषक जिंकेल असा आत्मविश्वास रवी शास्त्री यांनी व्यक्त केला. इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी सर्व खेळाडूंनी एअरपोर्टवर वेळ घालवला.
 
 

 
इंग्लंडला रवाना होण्यापूर्वी, संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी रवी शास्त्री यांनी शिर्डीला जाऊन साईबाबांचे दर्शन घेतले. रवी शास्त्री यांच्यासोबत भारतीय संघाचे गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण, क्षेत्ररक्षण प्रशिक्षक आर.श्रीधरही हजर होते. यावेळी भारतीय संघाच्या चांगल्या कामगिरीसाठी तिघांनीही साईबाबांकडे प्रार्थना केली.