गोमती मरीमुथू डोपिंग चाचणी अपयशी

    दिनांक :22-May-2019
नवी दिल्ली, 
 
गत महिन्यातच आशियाई अॅथ्लेटिक्स स्पर्धेत भारताला महिलांच्या 800 मीटर शर्यतीचे सुवर्णपदक जिंकून देणारी धावपटू गोमती मरिमुथू डोपिंग चाचणीत दोषी आढळली आहे. तिच्या नमुन्यात प्रतिबंधित औषधांचे अंश आढळल्यामुळे तिच्यावर तात्पुरती बंदी घालण्यात आली आहे.
 
 

 
 
 
 
 
तामिळनाडूच्या 30 वर्षीय गोमतीने एप्रिल महिन्यात दोहा येथे आशियाई स्पर्धेत 800 मीटरची शर्यत 2 मिनिट 2.70 सेकंदात पूर्ण करून सुवर्णपदक जिंकले होते. मात्र आता तिच्या अ नमुन्यात प्रतिबंधित उत्तेजक द्रव्याचे अंश आढळून आले आहे. आता जर तिच्या ब नमुन्यातसुद्धा दोष आढळून आला, तर तिला चार वर्षे बंदीच्या शिक्षेला सामोरे जावे लागणार आहे. भारताला आशियाई स्पर्धेतील एका सुवर्णपदकाला मुकावे लागेल. भारताने आशियाई स्पर्धेत तीन सुवर्ण, 7 रौप्यपदक व तेवढेच कांस्यपदक जिंकले  आहेत.