इम्रान आणि अवंतिका घटस्फोट घेण्याचे वृत्त इम्रानच्या सासूने फेटाळले

    दिनांक :22-May-2019
‘जाने तू या जाने ना’, ‘डेल्ली बेल्ली’ यांसारख्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारलेला अभिनेता इम्रान खान आठ वर्षांच्या संसारानंतर घटस्फोट घेणार असल्याची जोरदार चर्चा आहे. इम्रानची पत्नी अवंतिका मलिक मुलगी इमारासोबत त्याचं पाली हिल्सचं घर सोडून माहेरी परतली असल्याचीही माहिती आहे. पण इम्रान आणि अवंतिका घटस्फोट घेण्याचे वृत्त इम्रानच्या सासूने फेटाळले आहे. 

 
 
‘इन डॉटकॉम’ला दिलेल्या मुलाखतीत अवंतिकाच्या आईने त्या दोघांमध्ये मतभेद आणि वाद असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र घटस्फोट घेत नसल्याचे स्पष्ट केले. इम्रान आणि अवंतिकामध्ये वाद आहेत पण हे दोघे घटस्फोट घेणार नाही असं त्या म्हणाल्या.
 
इम्रान आणि अवंतिका यांनी दहा वर्षांच्या अफेअरनंतर २०११ मध्ये लग्नगाठ बांधली. लग्नानंतर तीन वर्षांत त्यांना इमारा ही मुलगी झाली. पण गेले काही दिवस दोघांमध्ये टोकाचे वाद होत आहेत. या वादांमुळेच विभक्त होण्याचा निर्णय दोघांनीही घेतला असल्याची चर्चा होती.