वर्ल्ड कपपूर्वी टीम इंडियाने खेळला 'हा' खेळ

    दिनांक :22-May-2019
नवी दिल्ली, 
 
३० मे पासून  क्रिकेटच्या कुंभमेळ्याला सुरुवात होणार आहे.  भारताला जेतेपदाच्या प्रबळ दावेदाराच्या रुपात बघितले जात आहे.  लंडनला रवाना होण्यापूर्वी सर्व खेळाडू रिलॅक्स मूडमध्ये बसलेले दिसले. या वेळी बहुतेक खेळाडू हे आपल्या टॅबलेट्सवर पब्जी हा गेम खेळताना दिसत होते.
 
 

 
 
 
 
 
बीसीसीआयने खेळाडूंचे काही फोटो आपल्या ट्विटर अकाउंटवर पोस्ट केले आहेत. त्यामध्ये युजवेंद्र चहल, मोहम्मद शमी, एमएस धोनी आणि भुवनेश्वर कुमार इंटरनेटवर लोकप्रिय गेम पब्जीचा आनंद घेताना दिसले. या फोटोत मोहम्मद शमीच्या टॅबलेटची स्क्रीन स्पष्ट दिसत आहे.  अशाच प्रकारे इतर फोटोंमध्ये देखील लेग स्पिनर युजवेंद्र चहल आपल्या मोबाइलवर हाच गेम खेळताना दिसत आहे. तर, महेंद्रसिंग धोनीसुद्धा आपल्या टॅबलेटमध्ये पब्जी खेळण्यात मग्न असल्याचे दिसत आहे.
 
 
 
या व्यतिरिक्त इतर काही फोटोंमध्ये कर्णधार विराट कोहली, हार्दिक पंड्या, केएल राहुल, विजय शंकरसह संघातील इतर खेळाडू आरामात बसून रिलॅक्स मूडमध्ये असल्याचे दिसत आहेत.
 
 
 
 
 
या फोटोंवर या खेळाडूंच्या चाहत्यांनाही ट्विट्स केली आहेत. खेळाडू पब्जी खेळताना पाहून चाहतेही आनंदीत झाले आहेत. 'वॉव, सर्वच पब्जीचे लव्हर आहेत', अशी प्रतिक्रिया एका चाहत्याने व्यक्त केली आहे.