सलमान प्रियांकासह काम करणार पण...

    दिनांक :22-May-2019
सलमानच्या 'भारत' चित्रपटाला अभिनेत्री प्रियांका चोप्राने ऐनवेळी भूमिका साकारण्यास नकार दिल्यापासून चित्रपट चर्चेचा विषय झाला आहे. तसेच तिच्या या नकाराने सलमान दुखावला गेला असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर सलमानने प्रियांकासह पुन्हा काम करण्यासाठी अट घातली आहे.
 

 
 
 
‘भारत’ चित्रपटाच्या चित्रीकरणाच्या पाच दिवस आधी प्रियांकाने भूमिका साकारण्यास नकार दिला होता. नुकताच झालेल्या एका मुलाखतीमध्ये सलमानने प्रियांकाने तिच्या लग्नामुळे चित्रपटात काम करण्यास नकार दिला असल्याचा खुलासा केला आहे. दरम्यान सलमानला पुन्हा प्रियांकासह काम करण्याची संधी मिळाल्यास सलमान काम करणार का असा प्रश्न देखील विचारण्यात आला होता. त्यावर सलमानने त्याची एक अट सांगितली आहे आणि त्या अटीनुसारच सलमान प्रियांकासह काम करणार असल्याचे त्याने सांगितले.
या अटींचा खुलासा करताना सलमनाने सांगितेल की भविष्यात त्याला प्रियांकासोबत नक्की काम करायला आवडेल पण त्याचा रोल चांगला असायला हवा. तसेच चित्रपटाती कथा देखील त्याला आवडायला हवी असे सलमानने सांगितले.