गडचिरोली -चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे अशोक नेते यांचा मोठ्या मताधिक्याने विजय

    दिनांक :23-May-2019
गडचिरोली: चिमूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार अशोक नेते यांनी त्यांचे निकटचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे डॉ.नामदेव उसेंडी यांचा दारुण पराभव केला आहे.
मतमोजणी च्या पहिल्या फेरीपासून भाजपचे अशोक नेते यांची आघाडी कायम ठेवली होती.
मतमोजणीच्या चोविसाव्या फेरी पर्यंत भाजपचे नेते यांना ५लाख ६६१० तर काँग्रेसचे उसेंडी यांना ४ लाख ३१ हजार ५७६इतके मताधिक्य होत यात अशोक नेते यांची ७५०३४ एवढी आघाडी होती. शेवटच्या फेरीचे आकडे येईपर्यंत भाजपचे अशोक नेते यांचा विजयाचा मार्ग मोकळा झाला होता.
गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदारसंघासाठी ११ एप्रिलला मतदान झाले होते यात ११ लाख ३८ हजार मतदारांनी मतदानाचा हक्क बाजवीला होता. एकूण मतदानाच्या ४५.४७% मत मिळविण्यात नेते यशवी ठरले आहे. एकूणच अशोक नेते यांच्या विजयाबद्दल शंका कुशकांना आजच्या विजयानी पूर्णविराम लागला आहे.