ही लाट नव्हे मोदींची त्सुनामी- मुख्यमंत्री

    दिनांक :23-May-2019
मुंबई : बहुमताने सत्ता स्थापनेचे केलेले भाकीत हे भाजपासाठी ठरत असून ही फक्त मोदींची लाटाच नव्हे तर त्सूनामी असल्याचे मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. भाजपला कौल दिल्याबद्दल त्यांनी मतदारांचे आभारही मानले आहेत.
'सर्वसाधारणपणे सत्ताधारी पक्षाबद्दल जनतेच्या मनात रोष असतो, ज्याला सत्ताविरोधी लाट म्हटले जाते. पण यावेळी केंद्रातील आणि राज्यातील भाजप सरकारबद्दल जनतेच्या मनात पोषक वातावरण अर्थात, प्रो-इन्कंबन्सी होती. मोदींवर लोकांचा प्रचंड विश्वास आहे हे देशात फिरताना जाणवत होते. त्यामुळेच लोकांनी मोदींना आधीपेक्षा जास्त प्रेम दिले असे मुख्यमंत्री म्हणाले.  यावेळी मुख्यमंत्र्यांनी यावेळी शिवसेनेचेही आभार मानले.