गोपाळ शेट्टी 118811 मतांनी आघाडीवर

    दिनांक :23-May-2019
मुंबई,
 
उत्तर मुंबई मतदारसंघात विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांच्यापुढे काँग्रेसने अभिनेत्री ऊर्मिला मातोंडकर हिच्या रूपाने तगडे आव्हान उभे केले आहे. ऊर्मिलाने धडाकेबाज प्रचार करून जोरदार हवा केली होती. त्यामुळे इथल्या लढतीकडे सगळ्यांचेच लक्ष लागले आहे.
 
 
 
 
 
लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात झाली असून उत्तर मुंबई मतदारसंघात गोपाळ शेट्टी यांना 180579 मते मिळाली आहेत. ऊर्मिला मातोंडकर यांच्या पारड्यात 61768 मतं मिळाली आहेत. गोपाळ शेट्टी यांनी 118811 मतांनी आघाडी घेतली आहे.
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघात एकूण 17 लाख 83 हजार, 870 मतदार असून यंदाच्या निवडणुकीत 60 टक्के मतदान झालंय. गेल्या निवडणुकीपेक्षा हा टक्का जास्त आहे. ही मतं कुणाच्या पारड्यात जातात, हे पाहावं लागेल. गेल्या निवडणुकीत गोपाळ शेट्टी यांना 6 लाख 64 हजार 004 मतं मिळाली होती, तर संजय निरुपम यांना 2 लाख 17 हजार 422 मतांपर्यंतच मजल मारता आली होती.