नागपुरातून नितीन गडकरी आघाडीवर

    दिनांक :23-May-2019
तभा ऑनलाईन टीम  
नागपूर, 
लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सध्या नागपुरातील कळमना मार्केटमध्ये सुरु असून केंद्रीय मंत्री नीतीन गडकरी यांनी आघाडी घेतली आहे.  दुसऱ्या फेरीत नितीन गडकरींना ४०,७४७ मते तर नाना पाटोले यांना २२,८३३ मते मिळाली आहेत.
दुसऱ्या फेरीनंतर नितीन गडकरी यांना एकूण ८१,२११ मते मिळाली असून ते ३३,३३३ मतांनी आघाडीवर आहेत.  तर त्यांचे प्रतिस्पर्धी नाना पटोले यांना एकूण ४७,८७८ मते मिळाली आहेत. 
 पहिल्या फेरीनंतर नितीन गडकरी १५,६२२ मतांनी आघाडीवर आहेत. गडकरी यांना ४०,८५१ तर काँग्रेसचे उमेदवार नाना पटोले यांना २५,२२९ मते मिळाली आहे. 

 
 
भाजपचे संजय धोत्रे आघाडीवर
अकोला : दुसऱ्या फेरीनंतर भाजपाचे संजय धोत्रे हे वंचितच्या अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर यांच्यापेक्षा 60 हजार 624 मतांनी आघाडीवर आहे.
भाजपाचे संजय धोत्रे - 151897
वंचित बहूजन आघाडीचे अ‍ॅड.प्रकाश आंबेडकर - 91268
काँग्रेसचे हिदायत पटेल - 67683
 
अकोल्यामध्ये पहिल्या फेरीनंतर संजय धोत्रे यांनी आघाडी घेतली आहे. त्यांना १६८२३ मतं मिळाली असून , प्रकाश आंबेडर यांच्या पारड्यात १०३८९ मतं पडली आहेत. हिदायत पटेल यांना ६७९४ मते मिळाली आहेत.