गडकरींनी मानले कार्यकर्त्यांचे आभार

    दिनांक :23-May-2019
नागपूर : भाजपचा आणि गडकरींचा बालेकिल्ला असलेला नागपूर मतदार संघात या निवडणुकीत २०८३४८ मतांनी विजय मिळविला. नितीन गडकरी यांना ६,४४,२६७ मतं मिळाली तर त्यांच्या विरुद्ध लढत देणारे नाना पटोले यांना ४,३५९१९ मतं मिळाली. गडकरींचा विजय निश्चित असल्याची चर्चा निवडणुकीआधीच नागपूरमध्ये होती. गेल्या पाच वर्षात देशात आणि नागपूरमध्ये लक्षणीय विकास कामे त्यांनी केली. नागपूर मेट्रो, सिमेंट रस्ते शहराचे सुशोभीकरण या सर्व कामांमुळे नागपूरचे रूप पालटून टाकले. निवडणुकीत झालेल्या विजयाबद्दल गडकरींनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. महाराष्ट्रात केवळ एक जागा सोडली तर बाकी सर्व जागांवर भाजपचा झेंडा रोवला आहे. जनतेने दिलेल्या समर्थनासाठी त्यांनी संपूर्ण देशवासीयांची आभार मानले .