संजय निरुपम केंद्रात की राज्यातच ?

    दिनांक :23-May-2019
मुंबई : निरुपम यांनी मुंबई काँग्रेसचे अध्यक्षपद पणाला लावून उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळविली. उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघात शिवसेनेचे गजानन किर्तीकर आणि काँग्रेसचे संजय निरुपम यांच्यात लढत झाली आहे. परंतु, त्यांना खासदार म्हणून दिल्लीत जाण्याची संधी मतदार राजा देणार आहे की नाही हे आज ठरणार आहे. दरम्यान या निवडणुकीत मराठी मतदारांची भूमिका फार महत्वाची ठरणार आहे. मतदार गजानन कीर्तिकरच्या पाठीशी उभे राहणार की संजय निरुपम यांच्या पाठीशी हे लवकर स्पष्ट होईल.