सुप्रिया सुळेंनी बारामतीचा गड राखला

    दिनांक :23-May-2019
बारामती: सुप्रिया सुळे यावेळी लोकसभा निवडणुकीत पराभूत होईल भाजपच्या या दाव्याला मूठमाती मिळाली आहे  असा दावा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला होता. याशिवाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनीही बारामतीची जागा जिंकण्याचा प्रबळ विश्वास व्यक्त केला होता. मात्र जवळपास लाखभर मतांची आघाडी घेत सुप्रिया सुळे यांनी बारामतीचा गड राखला आहे . यंदा या  मतदारसंघात १० अपक्ष उमेदवारांसह एकूण १८ जण निवडणुकीच्या रिंगणात होते.
बारामतीची निवडणूक ही पवार कुटुंबासाठी नेहमीच प्रतिक्षेची राहिली आहे. शरद पवार सलग पाच वेळा बारामतीतून खासदार होते. यंदा बारामतीतमध्ये राष्ट्रवादीच्या सुप्रियासुळे विरुद्ध भाजपाच्या कांचन कुल अशी लढत होती.