लाव रे ते फटाके - उद्धव ठाकरे

    दिनांक :23-May-2019
मुंबई : लोकसभा निवडणुकीत राज्यात भाजप-शिवसेनेने चांगलीच बाजी मारली असून शिवसेना अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्या सोबत या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या सहकाऱ्यांसह थेट 'मातोश्री'वर  पोहचले. फडणवीस व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी एकमेकांचे अभिनंदन करत पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी 'लाव रे ते फटाके' असा टोमणा  उद्धव यांनी राज ठाकरे यांना मारला. या निकालावर राज ठाकरे यांनी "अनाकलनीय" अशी एका शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. 

महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेच्या उमेदवारांनी ४२ जागांवर निर्णायक आघाडी घेतली आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीप्रमाणेच यावेळीही युतीची लाट राज्यात पाहायला मिळत आहे. देशातही पुन्हा एकदा मोदीलाट उसळली आहे. यावर बोलताना दोन्ही नेत्यांनी जनतेचे आभार मानले.