रणवीर सिंगच्या ‘८३’ मध्ये दिसणार 'हा' अभिनेता

    दिनांक :24-May-2019
गेल्या अनेक दिवसांपासून रणवीर सिंगचा ‘८३’ सिनेमा चर्चेत आहे.'८३' हा सिनेमा भारतीय विश्वचषक विजयाची कथा सांगणारा आहे. १९८३ मध्ये कपिल देव यांच्या नेतृत्वाखाली भारतीय क्रिकेट टीमने विश्वचषक जिंकला होता. यात रणवीर सिंग कपील देव यांची भूमिका साकारणार आहे.दिग्दर्शक कबीर खान या सिनेमाचे दिग्दर्शन करणार आहे. या सिनेमात आता आणखी एक अभिनेत्याची वर्णी लागली आहे. क्रिकेटर किर्ती आझाद यांच्या भूमिकेत दिनकर शर्मा दिसणार आहे. १९८३चा विश्वचषक जिंकण्यात त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
 
 
 

 
 
 
‘८३’ सिनेमाचे शूटिंग 5 जूनपासून स्कॉटलँडमधल्या ग्लासगोमध्ये सुरु होणार आहे. रणवीर सिंग आणि त्याच्या 83 सिनेमाच्या संपूर्ण टीमला नुकतेच धर्मशालामध्ये क्रिकेटचे प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. या व्हिडिओत रणवीर क्रिकेटमधले बारकावे शिकताना दिसला होता. स्वत: कपिल देव या व्हिडीओत रणवीर सिंगला क्रिकेटचे धडे देताना दिसले होते. रणवीरने देखील या कॅम्पमधील काही व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केले होते. या व्हिडिओत सिनेमाचा दिग्दर्शक कबीर खानसुद्धा दिसला होता.