अॅपल या वर्षी लाँच करणार तीन नवे आयफोन

    दिनांक :24-May-2019
प्रीमियम स्मार्टफोन कंपनी अॅपल आता या वर्षी तीन नवे फोन लाँच करणार आहे. 'अॅपल आयफोन ११', 'आयफोन एक्सआर २' लाँच करणार असल्याची चर्चा होती. मात्र, अॅपल तीन फोन लाँच करणार असल्याचे समोर आले आहे.

 
 
एका रिपोर्टनुसार, अॅपलने 'आयफोन ११', 'आयफोन ११ मॅक्स' आणि 'आयफोन एक्सआर २'साठी युरेशियन डेटाबेसमध्ये मॉडेल नंबर नोंदवले आहेत. यातील 'ए २१' हा नवीन 'आयफोन एक्सआर २'चा मॉडेल नंबर आहे. हा फोन तीन स्टोरेज पर्यायामध्ये उपलब्ध असणार आहे. त्याशिवाय त्यात दुसऱ्या फोनच्या तुलनेने स्लो इंटेल मॉडम असणार आहे. तर, 'आयफोन ११' आणि '११ मॅक्स'साठी 'ए २२' मॉडल नंबर नोंदवण्यात आला आहे. हे सर्व फोन तीन स्टोरेज पर्यायासह उपलब्ध असणार आहे.
भारतात आयफोन चांगलाच लोकप्रिय आहे. आता एकाच वेळी तीन नवीन आयफोन येणार असल्यामुळे ग्राहकांची उत्सुकता वाढली आहे. सध्या तरी कंपनीकडून याबाबत अधिकृत माहिती देण्यात आली नाही. मात्र, फोनची माहिती बाहेर फुटू लागली आहे. या नव्या आयफोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप असू शकतो.
दरम्यान, २२ मे रोजी अॅपलने आठव्या आणि नवव्या जनरेशन इंटेल प्रोसेसर असलेल्या मॅकबुक प्रो लॅपटॉप लाँच केले. पहिल्यांदा अॅपलने ऑक्टाकोर प्रोसेसर असलेल्या मॅकबुकला प्रो लाइनअपमध्ये घेतले आहे. नवीन ८ कोअर-प्रोसेसरचा पर्याय हा १५ इंचाच्या मॅकबुक प्रोवर उपलब्ध आहे. हा लॅपटॉप आतापर्यंतचा सर्वात जलद लॅपटॉप असल्याचा दावा कंपनीने केला आहे.