किशोर कुमार यांच्या भूमिकेत दिसणार अदनान सामी ?

    दिनांक :24-May-2019
मुंबई,
किशोरकुमार यांनी आपल्या खास शैलीत गाऊन अनेक पिढ्यांना मंत्रमुग्ध केले. याच हरहुन्नरी गायकाच्या आयुष्यावर आधारित बायोपिक आता येणार आहे. विशेष म्हणजे बायोपिकमध्ये किशोर कुमार यांच्या भूमिकेत गायक अदनान सामी दिसणार असल्याची चर्चा आहे.
 
 

 
 
 
अदनान सामीने अलीकडेच एका रिआलिटी शोमध्ये किशोर कुमार यांची गाणी रिक्रिएट केली. अदनानला गाताना ऐकून अनेकांना किशोर कुमार यांची आठवण आली. त्याचं प्रचंड कौतुकही झाले. त्यामुळेच, किशोर कुमार यांच्या बायोपिकमध्ये भूमिका साकारण्यासाठी अदनान सामीशी संपर्क साधण्यात आला अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. अदनान स्वत: उत्तम गायक, संगीतकार आणि अभिनेता आहे त्यामुळे किशोर कुमार यांचे व्यक्तिमत्त्व तो उत्तमरित्या साकारू शकेल असा विश्वास चित्रपटाच्या टीमला वाटतो आहे. या चित्रपटात अदनान काही गाणीही गाणार असल्याची माहिती मिळते आहे.
 
 


 
 
 
किशोर कुमार यांचा बायोपिक अनुराग बासू दिग्दर्शित करणार अशी चर्चा होती. रणबीर कपूर त्यात मुख्य भूमिका साकारणार होता. मात्र, काही कारणांमुळे हे शक्य झाले नाही. आता पुन्हा एकदा या बोयपिकचे काम सुरू झाले असून अदनानला यासाठी विचारले गेल्याची चर्चा आहे.