‘बोले चुडिया’ या चित्रपटाचे पोस्टर प्रदर्शित

    दिनांक :24-May-2019
छोट्या पडद्यावरील मौनी रॉयने तिच्या सौंदर्यामुळे आणि अभिनयामुळे अनेकांना भूरळ घातली आहे. तिच्या याच अभिनय कौशल्यामुळे आता तिचा खऱ्या अर्थाने बॉलिवूडमध्ये प्रवेश झाला आहे. ‘गोल्ड’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी मौनी लवकरच ‘बोले चुडिया’ या चित्रपटात झळकणार असून या चित्रपटाचं पहिलं पोस्टर प्रदर्शित झालं आहे.
 
 

 
मौनी रॉय ‘बोले चुडिया’ या चित्रपटामध्ये अभिनेता नवाजुद्दीन सिद्धीकी याच्यासोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाच्या माध्यमातून ही जोडी पहिल्यांदाच एकत्र स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन नवाजचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी करणार आहे. ‘बोले चुडिया’च्या माध्यमातून शमास पहिल्यांदाच दिग्दर्शकीय क्षेत्रात पदार्पण करणार आहे.