...तर कॉंग्रेसचा पहिला खासदार फक्त पंजाबमध्ये सापडेल!

    दिनांक :24-May-2019
 सूरतमधील एका आमदाराने चर्चगेटवरून गाडी पकडून उत्तरेकडे प्रवास केल्यास कॉंग्रेसचा पहिला खासदार थेट पंजाबमध्ये सापडेल, असे टि्‌वट केले आहे. सूरतमधील मजुरा येथील आमदार आणि भाजपा युवा मोर्चाचे राष्ट्रीय पदाधिकारी हर्ष संघवी यांनी कॉंग्रेसच्या पराभवावर टि्‌वट केले आहे. जर तुम्ही चर्चगेट स्थानकावरून गाडी पकडून उत्तरेकडे प्रवास सुरू केला, तर तुम्हाला कॉंग्रेसचा पहिला खासदार थेट पंजाबमध्ये सापडेल, असे त्यांनी आपल्या टि्‌वटमध्ये म्हटले आहे. कॉंग्रेसला अनेक राज्यांमध्ये भोपळाही न फोडता आल्याने त्यांनी हा टोला लगावला आहे.