'विश्वचषक स्पर्धेत धोनीने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी'

    दिनांक :24-May-2019
इंग्लंडमध्ये सुरु होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेला अवघे काही दिवस शिल्लक राहिलेले आहेत. मात्र अजुनही भारतीय संघात मधल्या फळीतल्या फलंदाजीच्या क्रमाचं गणित काहीकेल्या सुटताना दिसत नाहीये. प्रत्येक आजी-माजी खेळाडू आपापल्यापरीने मत मांडत आहेत. त्यात आज सचिन तेंडुलकरची भर पडली आहे. आगामी विश्वचषक स्पर्धेत महेंद्रसिंह धोनीने पाचव्या क्रमांकावर फलंदाजी करावी असं मत, सचिन तेंडुलकरने व्यक्त केलं आहे.
 
 

 
 
 
 
 
 
“माझ्या मते धोनीने विश्वचषकात पाचव्या क्रमांकावर फलंदाजीसाठी यावं. स्पर्धेत नेमका कोणता संघ उतरणार आहे, याची मला कल्पना नाही. मात्र शिखर आणि रोहित डावाची सुरुवात करणार असतील तर विराट हा साहजिकपणे तिसऱ्या स्थानावर खेळेल. यानंतर चौथ्या क्रमांकावर कोणत्याही फलंदाजाला संधी दिल्यास पाचव्या क्रमांकासाठी धोनी हा योग्य पर्याय आहे. यानंतर हार्दिक पांड्या फलंदाजीसाठी येऊ शकतो.” सचिनने आपलं मत मांडलं.