फुटबॉल विश्वचषकात 48 संघवाढ नाही: फिफा

    दिनांक :24-May-2019
लाऊसेन:
 
कतारमध्ये 2022 साली होऊ घातलेल्या फुटबॉल विश्वचषकात सहभागी संघांची सं‘या 32 वरून 48 संघ वाढविण्याची योजना फिफा बासनात गुंडाळली आहे. विद्यमान परिस्थिती लक्षात घेता संघवाढीचा प्रस्ताव करू शकत नाही, अशी सबब पुढे करत फिफाने संघवाढीची योजना फेटाळून लावली.
 
 

 
 
 
त्यामुळे आगामी 2022 कतार फुटबॉल विश्वचषकात पूर्वनियोजित कार्यक्रमानुसार  केवळ 32 संघच सहभागी होतील आणि आगामी 5 जून रोजी होणार्‍या पुढील फिफा कॉंग‘ेसमध्ये संघवाढी संदर्भात कोणताही प्रस्ताव मांडण्यात येणार नाही,असे फिफाने प्रसिद्धीपत्रकाद्वारे स्पष्ट केले.